भटकंती, भेटी आणि बरचकाहि !

December 28, 2008

पसायदान

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

December 27, 2008

जेथे जातो तेथे.. तू माझा संगाती..चालविसी हाती धरुनिया

जेथे जातो तेथे.. तू माझा संगाती..चालविसी हाती धरुनिया

२००८ निघुन चाललं आहे. २००९ चं स्वागत करण्यासाठि सर्वच जण उत्सुक आहे. २००९ कडे आशेने सर्वजण पहात आहेत.
२००९ साठि प्रत्येकाने काहि ना काहि तरी संकल्प सोडले असतील. २००८ साठि चा माझा संकल्प होता भारत भ्रमणाचा आणि त्यावर काहि तरी लिहिण्याचा. दुसरा संकल्प होता कि मराठि (देवनागरी) तुन दैनंदिनी लिहण्याचा. २००७ च्या मोक्षदा एकाद्शी ला मी वृंदावनात बांके बिहारी मंदिरात होतो. त्याला आता एक वर्ष होउन गेले.
मी स्वत: मराठि एक इयत्ता हि शिकलो नाहिये. मातृ भाषा फक्त बोलुन आणि पुस्तके वाचुन जशी जमली तशी शिकलो आहे ! पण हया ब्लॉग द्वारे मी माझे विचार मराठित सर्वांपर्यंत पोहचवु शकलो. मराठिब्लॉग ह्या वेबसाइट मुळे हा ब्लॉग जगातिल अनेक मराठि वाचकांनी प्रेमाने वाचला त्यांचा मी ॠणि आहे.
ह्या ब्लॉग मधले सर्व विचार आणि चुका ह्या माझ्या आहेत. मराठि (देवनागरी)लिपितुन दैनंदिनी लिहणं शक्य झालं ते ओम्कार जोशी ह्यांच्या गमभन ह्या फॉन्ट मुळे. मी त्यांचा सदैव ॠणि राहिन. ह्या मुळे मी परत मराठि कडे आकर्षित झालो आणि वर्षभर ह्या ब्लॉग वर फक्त देवनागरीतुन जमेल तसं मराठित लिहित राहिलो. .
२००८ नंतर हा ब्लॉग मी पुढे लिहिन का नाहि हे अजुन ठरवलं नाहिये... बहुतेक लिहिणार नाहि.
२००९ पासुन मी माझे विचार हे इन्ग्रजी मधे माझ्या नव्या ब्लॉग वर लिहित राहिन.

चालों वाटे आम्हीं तुझाचि आधार
चालविसी भार सवें माझा

बोलों जातां बरळ करिसी तें नीट
नेली लाज, धीट केलों देवा

विष्णुसूत

December 24, 2008

सजल नयन नित धार बरसती...

वीणेचे स्वर अबोल झाले
गीता मधले काव्यहि सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती
सजल नयन नित धार बरसती भावगंध त्या जळी मिसळती

आज सकाळी मी भैरवीतलं अजीत कडकडे(अशोक पत्कि, शांताराम नांदगावकर) यांचे "सजल नयन" हे गाणं ऐकलं आणि दिवसभर हे गाणं मनात राहिलं. ९० मैलाच्या ड्राईव मधे हे मी जवळ जवळ १०-२० वेळा ऐकलं. कोलोरॅडो च्या रॉकिज मधुन ड्राईविंग म्हणजे एक मौज असते. बर्फात गुंडाळलेले पर्वत,धुकं आणि गारठुन टाकणारी थंडि हि हवी हवीशी वाटणारी नाताळ ची सुट्टी "नॉस्टॅलजीक" करणार नाहि तर काय ?
अमेरीकेत रॉकिज किंवा "कॉन्टिनेन्टल डिवाईड" असे ज्या पर्वत रांगाना नाव आहे त्या पर्वतशिखरां मधे फिरताना निसर्गाचा जो अनुभव येतो तो मला शब्दात सांगण अवघड जाणार आहे. बर्फाळलेल्या ह्या प्रदेशात एक अलौकिक अनुभव ज्याला इन्ग्रजी मधला "डिवाईन" हा शब्द जवळचा वाटतो.
ह्या खडतर प्रदेशात गाडिनी फिरताना मला राहुन राहुन एक विचार सतावत होता तो म्हणजे.. जि.एम, फोर्ड सारख्या कंपन्यानी बनवलेले मजबुत इंजीनाचे ६-८-१२ सिलेंडर च्या गाडया नसत्या तर ह्या प्रदेशात रहाणे अशक्य होते.. टोयोटा, होन्डा, माजदा सारख्या जपानी कंपन्यांपेक्षा मी स्वत: अमेरीकन कंपन्यांच्या मजबुत गाड्या वापरतो व पसंत करतो... म्हणुन वाटतं जी एम, फोर्ड बंद पडु नयेत. असो.
बरीच मराठि गाणि ऐकुन झाली होती। आणि आनंदघनाचे शब्द आणि सुरांनी परत जमीनीवर आणलं

"सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी घाव बसंल घावावरी
सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे ! "

उद्दाच्या नाताळ च्या पार्टिला सगळ्यांना "हॅपि क्रिस्मस... हॅपि हॉलीडेज" करण्याची औपचारीकता करण्याची तयारी करण्या करता "वल्हव रे नाखवा॥ वल्हव रे रामा" ची सिडि ऐकत घरा जवळ पोहचलो !

December 22, 2008

२००९ वर्ष कसे असेल ?

२००९ वर्ष कसे असेल ?
आर्थिक संकट हे सर्व जगाला सतावत आहे. अमेरीकेत ह्याचा झटका जरा जोराने बसत आहे. जर आपण अमेरीकेची व्यवस्था पाहिली तर "उधारी वर चालणारी व्यवस्था" असे संबोधले तर ते गैर होणार नाहि. मी १९२० ते २०२० अशा शंभर वर्षांचा अभ्यास करत होतो. ग्रहांचे कार्यकत्व, राजनैतिक आणि आर्थिक चढ उतार ह्यांचा अभ्यास करत होतो. त्यानुसार मी काहि निष्कर्ष काढले आहेत.
वैदिक ज्योतिष हे वैयक्तिक भविष्याच्या दृष्टिकोनातुन आणि मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मुक्ति हे आहे, असे गृहित धरुन गणितं मांडली जातात. मेदनिय ज्योतिष शास्त्र हे "स्टॅटिस्टिक्स व प्रॅबेबिलीटि थिअरी" च्या जवळपास मोडते. ह्या आधारे.. ग्रहांची गती हि महत्त्वाची असते. वक्रि ग्रह, नेपच्युन-प्लुटो सारखे ग्रह,ग्रहणे व राहु आणि केतु ह्या बींदुंना अधिक महत्त्व दिले जाते. मेदनीय ज्योतिष शास्त्र हे सामाजिक घटना, आर्थिक व्यवस्था, राजनैतिक व्यवस्था आदि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठि महत्त्वाचे ठरते. इतिहास संशोधकांनी ह्या शास्त्राचा उपयोग काहि घटनां, सामाजिक व्यवस्था, राजनैतिक स्थिती आदि जाणुन घेण्या साठि हि केला आहे. उदा.. येशु चा जन्म, शिवाजी महाराजांचा जन्म, महाभारताचा काळ आणि घटना आदि...
अनेक मित्र व परीचितांनी हा प्रश्न गेल्या आठवड्यात विचारला कि आता पुढे काय होणार ? २००९ कसे असेल? ओबामा यशस्वी होइल का ? भारताचे भवितव्य कसे असेल ? ई . ई...
ह्यातिल काहि प्रश्नांची उत्तरे मी हि शोधतो आहे. ज्यांचा विश्वास मेदनीय ज्योतिष शास्त्रावर आहे त्यांच्या साठि काहि भकिते देत आहे.
१ जाने ते २६ जाने : राजनैतिक उलथापालथ.. नव्या नेत्यांचा उदय ( ओबामा शपथविधि २० जाने)
जाने ते जुलै : आर्थिक संकट अधिक तीव्र होउन १९२३-२९ च्या मंदिची आठवण करुन देणारा.
२६ जाने - २ जुलै : भारतात राजनैतिक उलथापालट, नव्या व्यवस्थे चा आणि नव्या नेत्याचा उदय. बहुतेक हा (हि) नेता मायवति असण्याची शक्यता.
मार्च २००९- जुलै २०१० : एका मोठया युध्दा ची शक्यता. / मोठ्या प्रमाणावर मृत्यु / नव्या रोगांचा उदय
मार्च २००९- जुलै २०१०: तीव्र आर्थिक मंदि
ओबामा बद्दल मी विशेष अभ्यास करुन असे भकित करतो कि मार्च २००९- जुलै २०१० हा काळ ओबामाला आणि अमेरीकेला लाभदायक नाहि. अनेक स्तरांवर अपयश , अचानक गोंधळाचे वातावरण, मानसिक व शारीरीक त्रास सहन करावे लागणार आहेत. २०११ ते २०२० हा ओबामा ला अतिशय लाभदायक ठरणार आहे.
भारतात आर्थिक व्यवस्था हि जुलै २०१० पर्यंत नाजुक असणार आहे. अनिश्वितता, आर्थिक संकट, युध्द/ रोगा मुळे मोठ्या प्रमाणात मृत्यु, राजनैतिक नेतृत्वा चा अभाव हे मुख्य प्रश्न भेडसावतिल. भारताचा नव्याने उदय हा २०१४ पासुन सुरु होइल असे मला वाटते.
२००९ चा पुर्वाध (जुलै पर्यंत) हा मंद व मंदिचा असेल. जुलै २००९ ते नोव्हे २००९ हा महत्त्वाचा, अनिश्विततेचा व पुन:बांधणी चा काळ असणार आहे. धार्मिक व तांत्रिक विद्दे कडे लोक झुकतील. २०११ ते २०१४ हा एक नव्या नेत्याचा उदय दाखवतो. २०२० मधे भारताच्या आर्थिक उन्नति ची सुरुवात होइल.

December 20, 2008

आर्थिक भविष्य

आर्थिक भविष्य
२००९-२०१० हा काल अतिशय महत्त्वाचा काळ ठरणार आहे. जागतिक आर्थिक बाजारपेठेत काहि मौलिक बदल घडणार आहेत. गेले कित्येक वर्षे अमेरीका म्हणजे सर्वात मोठि बाजारपेठ आणि "कन्झुमरस चा अड्डा" हे समीकरण होतं. हे समीकरण बदललं आहे. जगातिल सर्व "ऍसेटस" जी अमेरीके कडे धाव घेत होती त्याचे प्रमाण घसरणार आहे. अर्थात हि "ऍसेट्स" कुठे जातील हे आत्ता तरी सांगणं कठिण आहे.. पण भारतिय बाजारपेठ हि "ऍसेटस" स्वतः कडे आकर्षित करु शकते. त्या साठि आवश्यक असणारी सर्व कारणे भारता कडे आहेत... कन्झुमर्स चा मोठा समुह, आर्थिक प्रणाली, "डेवलपिंग नेशन स्टेटस", डेमोक्रसी. फक्त एक गोष्ट जी नेहमी भारताच्या विरुध्द जाते ती म्हणजे मौलिक सुविधा ( इन्फ्रास्ट्रकचर) ची कमी.
पुढिल पाच ते दहा वर्षात जर भारतात वीज, रस्ते, पाणि ह्या मौलिक सुविधा गावो-गावी उपलब्ध करता आल्या तर भारत २०२० मध्ये एक आर्थिक आणि राजनैतिक शक्ति नक्कि बनू शकेल. त्या साठि इन्फोसीस सारख्या कमीत कमी १०-१२ नव्या कंपन्या भारतात जन्माला आल्या पाहिजेत.
हे शक्य आहे का ? आत्ता ह्यावर फक्त येवढच सांगता येइल कि ह्या शर्यतीत भारताशी सामना करणारया मुख्य देशा मधे चीन, ब्राझिल, रशिया हे आहेत. भारताला नेहमी मागे टाकणारया गोष्टि म्हणजे "विविधता" , भ्रष्टाचार, सुसुत्रते चा अभाव, दिर्घ मुदतिची च्या आर्थिक व सामाजिक धोरणाचा अभाव.
अमेरीका ह्या रेस मधुन माघार नक्कि घेत नाहिये. अमेरीका हि नेहमीच सर्व "ऍसेट्स" चे हक्काचे गंतव्य स्थान आहे कारण येवढि आर्थिक उलथापालट होउन सुध्दा अमेरीकन कन्झुमर अजुन हि तेवढाच ऐटबाजीत खरेदि करायला उत्सुक आहे. पुढिल दोन वर्षात क्रेडिट कार्ड व क्रेडिट संबधि चे नियम बदलणार आहेत. त्यामुळे उधारी वर खरेदि करण्याच्या अमेरीकन पध्द्ति वर खीळ बसणार आहे. अशा स्थितीत बहुतेक "अमेरीकन कन्झुमरीझम" चा झंझावात कमी होईल आणि नव्या बाजारपेठां मधे "ऍसेटस" ची गुंतवणुक होइल.
२००९ पासुन ह्याचे लक्षण दिसुन येइल व २०२० मधे जगात नव्या आर्थिक निति चा अवलंब होईल असे संकेत आहेत. बहुतेक अमेरीकन डॉलर ची जगावरची पकड हि कमी होइल असे वाटत आहे. बघु !
जर माझ्या ब्लॉग वाचकांनी परत माझा ब्लॉग २०२० मधे तपासुन पाहिला तर हे सिध्द होईल !